Friday 28 September 2018

सावधान !!! शेअर बाजारात कुणालाही पैसे देण्यापूर्वी सावधान ...................


नमस्कार,,
 सर माझे नाव गोपाल  आहे मी भिवंडी ठाणे वरून बोलतोय (याच्या  प्रश्नाचा स्क्रीनशॉट खाली दिलेले आहे )


मला काही दिवसापासून सारखे  इंदोर, सुरत, भोपाल ,उडीसा ,आणि विविध ठिकाणावरून कॉल  येताय कि आमच्याकडे अकाउंट उघडा आम्ही या या रिसर्च कंपनीतून बोलतोय रोज च्या रोज ५० हजारावर ५ ते १० हजार फायदा मिळवा.  

आणि खूप जास्त फोर्स करताय ते कि आमची सेवा घ्याच म्हणून आणि महिन्याची त्यांची फीस आहे ७ हजार रुपये खरंच हे शक्य  आहे का ??

तुम्हाला सुद्धा  मार्केट मध्ये नवीन नवीन असतान असे कॉल आलेच असतील ना ??
मग तेंव्हा तुम्हाला काय करायचं हे माहित नसेल 
जर कंपनी खरी असेल तर 
माझा फायदा मी कशाला  बुडवू  असे अनेक विचार तुमचा मनात येतील 

आता हे झाले जर कंपनी खरी असेल तरच 

आणखी एक सांगतो कंपनी जर खरच एवढा चांगला फायदा तुम्हाला देत असेल ............तर ती कस्टमर ला फोन लावून कशाला धंदा करतेय  बरोबर ना ........स्वतःचातच फायदा वाढवण्याकडे लक्ष का नाही देत ???


आणखी एक गोष्ट  जर  तुम्हाला माहिती देऊन तुमचे पैसे बुडले तर कंपनीची ती तरुणी सांगते  कि मार्केट डाउन होत ,
तुम्हीच  चुकीचा ट्रेंड टाकला असेल
तुम्हीच चुकी केली  आहे
तुम्हाला अनुभव नाही किंवा कधी मधी  अस होतच असत अशा प्रकारे  म्हणून सांगतोय.
त्यामुळे आधीच सावधान झालेले बरे.

मग आता काय करायचं यांचे कॉल तर रोजच्या रोज येतात काय करायचं ???
तर त्यांना सरळ भाषेत सांगायचं मला तुमच्या कडून सेवा घ्यायचीच नाहीये 
किंवा मी ट्रेडिंग करताच नाहीये 
माझयाजवळ आता पैसे नाहीये 
मला आता लॉस झालाय ५० हजारांचा त्यामुळे मला कॉल करू नका नाही तर अपमान सहन करावा लागेल 

यातला जे योग्य उत्तर वाटेल ते चिपकून द्या  कारण पैसा तुमच्या कष्टाचा आहे आणि तो कुण्या चुकीचा हातात जात काम नये 

म्हणून आताच  सावध व्हा  जर कुणी म्हणत आले कि आम्ही तुमचे अकाउंट उघडून देते तुम्हाला सेवा आणि सुविधा देतो तर भोपाळ, गुजरात, सुरत, इंदोर वरून येणाऱ्या कॉल पासून सावध राहा.. 

आता राहिला प्रश्न डिमॅट अकाउंट उघडायचं तर खालील लिंक वापरून आपला अकाउंट आपणच उघडा 

अकाउंट ओपन कसा करायचं याची माहिती नसेल तर खाली एक पुस्तकाची लिंक आहे  त्यात माहिती आहे 


शिवाय शेअर बाजारात जर नवीन आहेत तर शेअर बाजार तुमच्या हातात म्हणू नवीन माणसांना दिशा देणार पुस्तक सुद्धा खालच्या लिंक वर उपलब्ध आहे  शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड  , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे.  हे पुस्तक आपल्या इमेल वर येईल  सोबतच त्याची पावती पण मिळेल  https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/


जर वरच काहीच तुम्हाला जमत नसेल तर खाली शेअर मार्केट मधील सर्व विडिओ ची लिंक दिली आहे
https://youtu.be/8RQeH4TclSQ    सेक्टर म्हणजे काय ?? शेअर मार्केट मध्ये कुठले कुठले सेक्टर आहे ??

https://youtu.be/LmY6RoNMWuM    डिमॅट अकाउंट मधून पैसे आधी तुमच्या बँकेत येतात  ???सेटलमेंट म्हणजे काय ???

https://youtu.be/hib72atZQBk   ह्या विडीओ  मध्ये शेअर बाजारची सुरवात नेमकी कुठून व कशी करावी हे सांगितलेले आहे सोबतच काही ठळक मुददे दिलेले आहे जे  वापरून तुम्ही सुरवात करू शकता.

https://youtu.be/dm47NsijodU       DEMAT अकाऊंट मधून तुमचे पैसे चोरीला जाऊ शकता का ???

https://youtu.be/yavioy14SCU             गुंतवणूक कमीत कमी किती करावी

https://youtu.be/fCEW1CYXdj0        Broker & Brokerage,ब्रोकरेज आणि ब्रोकर


आणखी एक कळकळीची विनंती माझे हे चॅनेल  (U way Marathi ) आणि  ब्लॉग आणि माझा whatsapp  नंबर 9607-448980 जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहचावा जेणेकरून मला  या क्षेत्राबद्दल माहिती आणि ज्ञान देता येईल 






















Wednesday 12 September 2018

शेअर मार्केट मधील उधारी

नमस्कार आज आपण बघणार आहोत शेअर मार्केट मधील उधारी

उधार ??? मला कोण देणार हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल ?

पण जर तुमच DEMAT ACCOUNT असेल तर तुमचा ब्रोकर तुम्हाला उधारी देतो
standerd शब्दात याला MARGIN किंवा LEVERAGE असेही म्हणतात.

हि उधारी तुम्हाला इंट्रा  डे ट्रेडिंग साठी मिळते तर काही ब्रोकर तुम्हाला DELIVERY या प्रकारात सुधा उधारी देत असता
जर तुम्ही इंट्रा डे ट्रेडिंग केली तर दिलेली उधारी तुम्हाला त्याच दिवशी परत करावी लागते नव्हे  तर ब्रोकर तुमच्याकडून ती उधारी आपोआप वापस घेत असतो

जर नफा झाला तर तुमची मुद्दल आणि नफा तुमच्या अकाऊंट मध्ये येतो आणि जर तोटा झाला  तर मुद्दल किंमतीतून तोटा वजा होते अशा प्रकारे तुम्ही कमी पैशात जास्त शेअर घेऊन ट्रेडिंग करू शकता.

आता हि उधारी कशी आणि काय मिळते या साठी मि खाली एक लिंक देत आहेत.त्यावर जाऊन फाईल बघावी यात कंपनीचे नाव आणि तिला मिळणारी  उधारी याची साधारणपणे नोंद दिली आहे

यातील सर्व माहिती हि ब्रोकर नुसार बदलू शकते काही ब्रोकर कमी तर काही ब्रोकर जास्त उधारी देतात


वरील फाईल मोफत आहे  हि फाईल आपल्या इमेल वर येईल. सोबतच अनिखी काही पुस्तके किंवा वीडीओ बघायचे असल्यास खाली क्लिक करावे.

 ब्रोकर आणि ब्रोकरेज 

शेअर बजारातील नवीन लोकांसाठी 

डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html

Tuesday 4 September 2018

शेअर ब्रोकरेज आणि ब्रोकर ,broker ani brokerage

नमस्कार मित्रानो 
तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार 
आजचा हा लेख मी बनवत आहे ब्रोकरेज म्हणजेच शेअर खरेदी आणि विक्री साठी लीगणारी फीस 
आणि हि किती असू शकते याबद्दल. 

आपण सगळे या शेअर मार्केट साठी कदाचित नवीन असाल आणि त्यामुळेच आपल्याला यात खूप अडचणी येत असेल म्हणूनच माझ्झ्या वाचकांच्या अग्रहवास्तव मी हा लेख लिहीत आहे. 
मी खाली एक उदाहरण देत आहे ज्यात आपण शेअर खरेदी विक्रीची जी फीस भरतो ती कोणाकडे आणि कशी भरतो आणि ब्रोकर कोण आहे हे समजावून सांगितले आहे. 

एका शेतकऱ्याला ह्या वर्षी  १०० पोते गहू झाला आता तो गहू जर त्याला विरून पैसे कमवायचा आहे तर त्याच्या समोर २ पर्याय आहे 

पहिला पर्याय म्हणजे तो डायरेक्ट दुकान मांडणार आणि ज्यात गहू विक्री करणार,ह्या गोष्टीत त्याला खूप मोठे मजूर दुकान ,वजन काटा ,आणि इतर गोष्टी लागणार शिवाय त्याला स्वतःच त्या ठिकाणी थांबून सर्व व्यवहार बघावा लागणार बरोबर ना. 


आणि दुसरा पर्याय कि तो आडत  किंवा मोंढा किंवा धान्य बाजारात जाणार त्या ठिकाणी तो आपला संपूर्ण गहू एका व्यापाऱ्याला विकणार  आता व्यापाऱ्याकडे दुकान थाटण्यासाठी लागणारे सर्व सामान आणि मजूर आधिपासुनच  असेल आणि तो एक एक पोटे गिर्याईकाला त्याच्या मागणी नुसार काही पॆसे वाढवून विकणार 

अगदी तसेच शेअर ब्रोकर चे आहे 
या उदाहरणातील शेतकरी म्हणजे शेअर बाजारातील विविध कंपन्या आहे   त्यांनी ब्रोकर ला परवानगी दिली आहे कि आमचा गहू तू विकला पाहिजे (ब्रोकर म्हणजे असा माणूस किंवा कंपनी जी शेअर बाजारातील विविध शेअर आपल्याला विकत देते किंवा घेते म्हणजेच शेअर चा व्यापारी )
आणि यात शेअर विकत घेणारे  म्हणजे आपण /गिराईक  आहे . 

आपण जेंव्हा काही शेअर विकत घेतो तेंव्हा ते शेअर चे विनिमय होण्यासाठी जी फीस द्यावी लागते त्यालाच ब्रोकरेज म्हणतात. 

ब्रोकरेज सोडून शेअर खरेदी विक्री वर आणखी फीस लागते ती फीस खालील प्रमाणे असते. मी झेरोधा  ब्रोकर ची फीस काय असू शकते हे खालील चित्रात  सांगितलेले आहे 

यात त्यांचे ब्रोकेरज चार्जेस हे ०.०१% एवढे दिले आहे म्हणजेच तुम्हाला रुपये १०० च्या देवाण घेवाणीसाठी १ पैसे एवढाच ब्रोकरेज लागेल. म्हणजे १००० रुपयाला फक्त आणि फक्त १० पॆसे 
आणि १० हजार रुपयाला ब्रकेरेज लागेल १ रुपया 
आणि १ लाख रुपयाला ब्रोकरेज लागेल फक्त १० रुपये 



ब्रोकेरेंज  हा तुमच्या खरेदी आणि विक्री ची किंमत मिळवून त्यावर लावला जातो 
म्हणजेच शेअर खरेदी केले १० हजार रुपयाचे आणि विकले १० हजार रुपयालाच तर मग तुम्हाला २० हजारावर ब्रोकरेज आणि बाकीचे चार्जेस लागतील . 

मी अपेक्षा करतो कि वरील माहिती तुम्हाला समजली असेलच पण जर शेअर मार्केट विषयी आणखी काही जाणूनच  घ्यायचं आहे तर खालील लिंक वर एक ईबुक  दिलेले आहे ज्यात सॉफ्टवेअर मध्ये शेअर कसे बघायचे शेअर कुठले घ्यायचे ,मार्केट मध्ये तोटा झालं तर काय करयचा आणि जे नवीन आहे ज्यांना काहीच माहिती नाही अशा लोकांनी तर पुस्तक घेतलेच पाहिजे










डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा.

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html 

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...