Friday 16 November 2018

इंट्रा डे (intraday) आणि डेलिव्हरी (Delivery) शेअर मधील फरक

नमस्कार मित्रानो,


शेअर मार्केट मराठी (https://sharermarketmarathi.blogspot.com/)  हा ब्लॉगस्पॉट आणि u way Marathi या Youtube  channel द्वारे मी आपल्याला शेअर मार्केट  (share market) माहिती, मोफत टिप्स, इंट्राडे शेअर ( Intra day Share) , डिमॅट अकाउंट ओपनिंगची ( Demat Account Opening) माहिती आणि आपल्या प्रश्नाचे उत्तरे आपल्या मोबाईल वर पाठवत असतो. 

           परंतु १००० च्या वर लोक माझ्याशी जोडलेले आहे त्यामुळे  मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला वेळ लागत आहे शिवाय मोबाईल  वारंवार हँग होतोय आणि मला उत्तरे देता येत नाहीये,तुम्हाला माझ्या सर्व  मित्रांना माझी विनंती आहे कि तुमचे प्रश्न तुम्ही YOUTUBE channel वर कंमेंट करा जेणेकरून मोबाईल पण हँग होणार नाही आणि तुमचे ऊत्तरे मी समर्पकपणे देऊ शकेल. 

https://www.youtube.com/channel/UCUPpBDxG7aWEeMcpirE4-AQ/videos?view_as=subscriber


तर आजचा विषय आहे 

इंट्रा डे  आणि डेलिव्हरी शेअर मधील फरक 

DIFFERENCE IN INTRA-DAY & DELIVERY 

इंट्रा डे  (INTRA DAY TRADING)

म्हणजे  एकाच दिवसात सर्व व्यवहार पार पडणे . सर्व व्यवहार म्हणजे काय तर शेअर खरेदी पण करणे आणि शेअर विकणे सुद्धा ....... 
सकाळी शेअर खरेदी करा आणि योग्य किंमत येताच तो लगेच विकून द्या ... आता योग्य किंमत हि ज्याच्या त्याचा गुंतवणुकीच्या किंमतीनुसार बदलत असते पण शेअर किंमतीच्या  0.75% परतावा मिळताच तो विकू शकता. 

इंट्राडे चे फायदे 

कामाची वेळ सकाळी ९ ते ३:३०
फायदा लगेच हातात 
कमीत कमी भांडवलात सुरवात
 शिवाय ब्रोकर कडून उधारी पण मिळते 
एका शेअर पासून ते १ लाख शेअर खरेदी करू शकता*

झटपट नफा मिळवण्यासाठी इंट्रा डे  हा एक उत्तम पर्याय आहे 
परंतु आधी अनुभव नाही आणि तुम्ही नवीनच असल्यावर तुम्हाला नफा कमी आणि तोटा होण्याचा जास्त धोका असतो. तेंव्हा तुम्ही जोखीम आधीच ठरवून आणि पैशाचा ताळमेळ आणि हिशोब ककरुणाच इंट्राडे ट्रेडिंग केलीली बरे . 
आता इंट्राडे साठी शेअर कसा शोधयचा याचा जर अभ्यास करायचा असेल तर पुढील ईबुक तुम्ही विकत घेऊ शकतात. https://www.instamojo.com/uway123/e02da340c3aa25cf6249fe35fd5befd7/     हे ईबुक मेल वर येईल किंवा तिथेच डाउनलोड बटनावर क्लीक करून डाउनलोड करू शकता.

खालील लिंक वर जाऊन इंट्रा डे  शेअर कसा निवडता याचा सुद्धा विडिओ दिलेला आहे 



डिलिव्हरी ट्रेडिंग (DELIVERY TRADING )

यात तुम्ही एक शेअर किंवा अनेक शेअर खूप जास्त कालावधी साठी  विकत घेऊन स्वतःकडे ठेवतात. म्हणजे आज जर  शेअर तुम्ही घेतला तर तुमच्या मनानुसार किंवा तुम्हाला नफा मिळाल्यावर तो विकत असतात 

आता जेव्हा तुम्ही नवीन असतात तेंव्हा स्वस्त शेअर च्या मागे पडतात आणि अशा कंपन्यांचे शेअर घेतात कि ज्या कंपन्या आधीपासूनच तोट्यात आहे. तेंव्हा  डिलिव्हरी साठी शेअर घेताना कंपनीचा अभ्यास करूनच शेअर घ्यावे. 
शिवाय तज्ञ् लोकांचे मत आणि कंपनीचा वाढत फायदा लक्षात ठेऊन शेअर निवडावे. 

डिलिव्हरी शेअर चे फायदे 
शेअर विकण्यासाठी कुठलीही सक्ती नाही 
अभ्यासला वेळ मिळतो 
कंपनीचे ओळख आणि माहिती चांगल्या  प्रकारे समजते कंपनी 
 डिव्हिडंड आणि बोनस देत असेल तर आपल्या नफ्यात आणि शेअर मध्ये वाढ होते. 

शेअर मार्केट ची बेसिक माहिती पाहिजे असेल आणि गुंतवणुकीला सुरवात करताना काय काय करायला पाहिजे याचा जर अभ्यास करायचं असेल तर पुढील पुस्तक खर्डे करा ज्यातून खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

तुम्हाला जर आणखी काही माहीती  हवी असेल तर तुमचे नाव ,ई-मेल ,गाव आणि अनुभव 9607-448980 या क्रमांकावर पाठवा. 
इंस्टाग्राम वर सर्च करा https://www.instagram.com/share_market7/
फेसबुक वर आम्ही या पेज वर आहोत https://www.facebook.com/sharermarketmarathi


No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...