Friday 31 August 2018

जाणून घ्या रुपया का घसरला ??? फायदे आणि तोटे


जाणून घ्या रुपया का घसरला ??? फायदे आणि तोटे 

गुरुवारी रुपया नीचांकी पातळीवर आला. डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी वधारून 70.63 प्रति डॉलरवर आला. जागतिक चिंतेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरच्या मागणीत वाढ झाल्यामुळे रुपयावर दबाव आहे.  आणि याच कारणामुळे रुपया घसरत आहे तज्ज्ञांच्या मते रुपया आणखी खाली घसरण्याची चिन्हे आहे. रुपया या वर्षी 10% ने घटला. या वर्षात रुपयात सतत कमजोरी आली आहे. यावर्षी आता रुपया 10 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या  वर्षी रुपयामध्ये 6 टक्के वाढ झाली होती, परंतु यावेळी अनेक घटक आहेत, ज्यामुळे रुपयावर दबाव आला आहे.

जागतिक बाजारपेठेत डॉलर ची मागणी सतत वाढत आहे शिवाय कच्च्या तेलाच्या किंमतीत हि चांगलीच वाढ झालेली आहे हे एवढं कमी होत कि काय चीन आणि अमेरिका यात व्यापार युद्ध रंगत चाललय  आहे त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठ आणि रुपया वर झालेला आहे या शिवाय अमेरिकेच्या फेडरल बँकेचे व्याजदर वाढले आहे त्यामुळे सुद्धा रुपया कमी झालेला आहे .

आता हे सगळ्या कारणच मला काय करायचं असाच प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर निट लक्ष द्या कारण ह्या सगळ्या जागतिक घडामोडीचा परिणाम शेअर मार्केट वर पडत असतो

भारत आपल्या देशाच्या 82 टक्के कच्चे तेल  इतर देशांमधून खरेदी करतो, त्या बदल्यात डॉलर द्यावे लागते. रुपयाचे अवमूल्यन आयात बिल वाढवणार आहे, जे तेल कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव टाकेल. अशा परिस्थितीत तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवू शकतात.

ज्या कंपन्यांची महसुली प्रामुख्याने निर्यात आधार असते म्हणजे ज्या कंपन्या भारतातून बाहेर निर्यात करतात त्यांना जास्तीत जास्त  त्या कंपन्यांना फायदा होईल.

खालील कंपन्या च्या शेअर वर लक्ष ठेवा कारण dollor जसा वर जाईल ह्या कंपन्याचा फायदा होईल. 

डॉलरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आयटी आणि फार्मा क्षेत्रातील. यात टीसीएस, इन्फोसिस, अरबिंदो फार्मा, कॅडिला आणि विप्रो या कंपन्यांचा समावेश आहे. ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ऑइल इंडिया लिमिटेडसारख्या गॅस उत्पादकांना डॉलरच्या वाढीचा फायदा मिळेल.



डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा,एक ई बुक आहे जे आपण कुठेही कधीही आपल्या मोबाइल वर save  करून वापरू शकता. आणि अकाउंट उघडू शकता. 
पुस्तक घेण्यासाठी आणि अकाऊंट उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 


शेअर बाजारची माहिती मराठीतून  मिळवण्याकरिता आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीचे नियम समजून घेण्याकरिता  खाली एक इबुक दिलेले आहे .ते तुम्ही विकत घेऊ शकता.
 पुस्तक अशा लोकासाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही पण त्यांची खूप इच्छा आहे कि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून नफा मिळवायचा.अशा लोकासाठी काही अडचणी येतात सर्वात प्रथम तर काय करायचे हेच महिती नसते, त्यातल्या त्यात सर्व बाजारातील पुस्तके हि इंग्रजी मध्ये असतात ज्यात क्लिष्ट आणि अगदी डोक्याच्या वरतून निघून जाणारी भाषा आणि योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने शेअर बाजारातून पैसे कमवण्याच्या स्वप्नावर पाणी फिरते.अशा वेळेस जर एखाद मराठी पुस्तक भेटलं,ज्यात शेअर मार्केट ची सुरवात कुठून करावी व कशी करावी हे दिलेले असेल तर किती बर होईल ना.म्हणजे इंग्लिश पुस्तकातील अवघड वाटण्याऱ्या गोष्टी सहजपणे मराठीतून समजतील आणि शेअर बाजारात लवकरात लवकर फायदा कसा करून घेता येईल हे समजेल.
*पुस्तकात असण्याऱ्या महत्वाच्या गोष्टी*
फायद्याचे शेअर शोधायचे कशे ,इंट्रा डे ट्रेडीग कशी करायची ,पैसे किती आणि कसे गुंतवायचे 
माझ्या जवळ कमी पैसे आहे तर टप्याटप्याने गुंतवणूक कशी कराल ,मार्केट चे इंडेक्स म्हणजे काय 
कंपनीची गटवारी कशी विभागल्या गेली आहे ,नेमका फायदा कशात ,तोटा झाला तर काय करावे















Wednesday 29 August 2018

सोच सही तो , लाईफ सही !! लाईफ सही तो , हेल्थ सही

 सगळेच धडे पुस्तकातुन शिकायला मिळतील असे काही नाही. काही धडे आयुष्य , नाती , समाज , व्यवसाय व अनुभवातुनही मिळतात ... ✍*

दोन घटना ...
 नोकियाने Android ला नाकारले

 याहूने गूगलला नाकारले 

संपली कहाणी ...
_धडा मिळाला की ...
धोका पत्करा
बदल स्वीकारा

काळानुरूप तुम्ही बदलला नाहीत तर तुमचे अस्तित्वच संपेल.


आणखी दोन घटना ...
फेसबुकने व्हॉट्स ॲप आणि इन्स्टाग्रामला विकत घेतले .
 फ्लिपकार्टने Myntra ला विकत घेतले .Myntra ने त्याअगोदर Jabong ला विकत घेतले आणि आता वॉलमार्टने फ्लिपकार्टला विकत घेतले .
संपली कहाणी ...

_*धडा मिळाला की ....*_
इतके शक्तीशाली व्हा की तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्याशी हात मिळवतील .
 सर्वोच्च स्थान प्राप्त करा म्हणजे तुम्हांला स्पर्धाच उरणार नाही .
सतत नाविन्याचा शोध घेत रहा
.

आणखी दोन गोष्टी ...
 कर्नल सॅंडर्स यांनी ६५ व्या वर्षी KFC ची सुरुवात केली .
KFC मध्ये ज्याला नोकरी मिळू शकली नाही त्या जॅक मा ने Alibaba ची निर्मिती केली .
संपली कहाणी ...
_*धडा मिळाला की ....*_
वय हा फक्त एक अंक आहे .
फक्त सतत प्रयत्न करणारेच यशस्वी होतात
.


_ शेवटचं महत्वाचं ...
लॅम्बॉर्गिनीची  निर्मिती , फेरारीचा  मालक एन्झी फेरारी याने एका ट्रॅक्टरमालकाचा अपमान  केल्यानंतर झाली .
संपली कहाणी .
..
_धडा मिळाला की
कुणालाही कधीही कमी लेखू नका .
 यश मिळवून दाखवणे यापेक्षा उत्तम बदला घेणे नाही .
फक्त कठोर मेहनत करीत रहा !!
वेळेची योग्य गुंतवणूक करा .
जे तुम्हांला आवडतं ते जरूर करा


अपयशाला घाबरू नका .... 
  _सोच सही तो , लाईफ सही !
लाईफ सही तो , हेल्थ सही 


आणि सर्वात महत्वाच शेअर मार्केट पण असच आहे  


डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा,एक ई बुक आहे जे आपण कुठेही कधीही आपल्या मोबाइल वर save  करून वापरू शकता. आणि अकाउंट उघडू शकता. 
पुस्तक घेण्यासाठी आणि अकाऊंट उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://www.instamojo.com/uway123/zerodha-demat-account/


शेअर बाजारची माहिती मराठीतून  मिळवण्याकरिता आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीचे नियम समजून घेण्याकरिता  खाली एक इबुक दिलेले आहे .ते तुम्ही विकत घेऊ शकता.
 पुस्तक अशा लोकासाठी आहे ज्यांना शेअर बाजाराबद्दल काहीच माहिती नाही पण त्यांची खूप इच्छा आहे कि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून नफा मिळवायचा.अशा लोकासाठी काही अडचणी येतात सर्वात प्रथम तर काय करायचे हेच महिती नसते, त्यातल्या त्यात सर्व बाजारातील पुस्तके हि इंग्रजी मध्ये असतात ज्यात क्लिष्ट आणि अगदी डोक्याच्या वरतून निघून जाणारी भाषा आणि योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने शेअर बाजारातून पैसे कमवण्याच्या स्वप्नावर पाणी फिरते.अशा वेळेस जर एखाद मराठी पुस्तक भेटलं,ज्यात शेअर मार्केट ची सुरवात कुठून करावी व कशी करावी हे दिलेले असेल तर किती बर होईल ना.म्हणजे इंग्लिश पुस्तकातील अवघड वाटण्याऱ्या गोष्टी सहजपणे मराठीतून समजतील आणि शेअर बाजारात लवकरात लवकर फायदा कसा करून घेता येईल हे समजेल.
*पुस्तकात असण्याऱ्या महत्वाच्या गोष्टी*
फायद्याचे शेअर शोधायचे कशे 
इंट्रा डे ट्रेडीग कशी करायची 
पैसे किती आणि कसे गुंतवायचे 
माझ्या जवळ कमी पैसे आहे तर टप्याटप्याने गुंतवणूक कशी कराल 
मार्केट चे इंडेक्स म्हणजे काय 
कंपनीची गटवारी कशी विभागल्या गेली आहे 
नेमका फायदा कशात 
तोटा झाला तर काय करावे
https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/



Saturday 25 August 2018

काय तुम्ही शेअर बाजारात नवीन आहात??

काय तुम्ही शेअर बाजारात नवीन आहात

नमस्कार सर ,
माझ नाव किरण ,मी शेअर बाजारात नवीन आहे मला यातील काहीच माहिती नाही आणि मला हे सर्व शिकायचं  आहे त्यासाठी काय कराव लागेल
अशा आशयाचे अनेक प्रश्न मला माझे CLIENT मला विचारात असतात
मी दिलेल्या उत्तराने काही लोकांचे समाधान  होते तर काही जन आणखी द्विधा मनस्थितीत पडतात त्यामुळे आज हा लेख मी आपल्या पर्यंत पोहचवत आहे.शेअर मार्केट मध्ये उतरायचं तर काय काय तयारी केली पाहिजे  तर सर्वात पहिले  आपल्याकडे काही महत्वाच्या गोष्टी पाहिजे, ह्या महत्वाच्या आपल्या दैनदिन जीवनातल्या आहे  आपल्याला मी विनंती करतो किं त्या गोष्टी जर नसेल तर सर्व प्रथम त्या उपलब्ध ठेवा.

डिमॅट अकाउंट साठी लागेल
पॅन कार्ड
आधार कार्ड
ज्या बँकेचे खाते आहे त्याच बँकेचा चेक
किंवा सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट.
 कॉम्पुटर / मोबाईल / लॅपटॉप
किंवा टॅबलेट ज्याला इन्टरनेट काँनेक्टिविटी आहे.

शेअर बाजारात तुम्ही उतरताय  म्हणजे तुम्हाला लाखो रुपये कमवण्याची इच्छा असेल पण हे कमवायचे कसेयाची माहिती घेता जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये उतरले तर समजून घ्या तुमच्या गोड स्वप्नावर पाणी फिरले आहे. शेअर बाजारात उतरताना खालील माहिती घेणे खूप गरजेचे आहे

सर्व प्रथम  जर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज आहे किंवा तुम्ही हा विचार करताय कि मी कुणाकडून तरी उधार घेऊन शेअर बाजारात गुंतवले  आणि अल्प कालावधीत त्याची रक्कम दुप्पट करेल तर हे भरदिवसा पाहिलेले स्वपच आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा  पहिला  नियम कुणाचाही पॆसा उधार घेऊन गुंतवणूक करू नका आणि तुच्यावर जर कुणाचा पॆसा उधार असेल तर तो लवकरच परतफेड करा आणि मगच शेअर बाजारात  उतरा. 

शेअर बाजारात जो पैसा तुम्ही अडकवणार आहे तो तुमच्या गरजेच्या गोष्टीतील नकोच. 
जर पुढच्या - महिन्यात तुच्या घरात एखादे मंगल कार्य आहे ,नवीन वस्तू घयायची आहे ,लग्नासाठी किंवा बर्थडे साठी पैसे जमवले  आहे  तर असा पैसे शेअर मध्ये नका लावू  कदाचित तुम्ही पॆसे गुंतवले आणि मार्केट कोसळलं तर लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागणार नाही अशा वेळ तुम्ही शेअर मार्केट ला शिव्यांची लाखोली वहाल आणि लोंकाना सांगाल कि शेअर बाजारात पॆसे फक्त बुडतातच. 

हातात शिल्लक असणारा किंवा तुमची अशी सेविंग ज्याची पुढची वर्ष तरी गरज पडणार नाही अशा रक्कम तुम्ही शेअर बाजारात गुंतवू शकतात. 
हा पॆसा गुंतवत अस्ताणेच तो कुठल्या कारणास्तव गुंतवला आहे आणि त्याची किती वाढ झाल्यावर तो शेअर मार्केट मधून काढायचा हे आधीच ठरवले गेले पाहिजे सोबतच यात रिस्क मॅनेजमेंट पण केली पाहिजे. 

जसे कीं तुम्ही १०००० रुपये गुंतवत आहेत तर १०००० जेंव्हा १२०००  होतील तेंव्हा मी ते बाजारातून काढून घेईल तर रुपये १२००० झाली तुमची टार्गेट रक्कम आणि जर गुंतवलेले पैसे  ८००० झाले तरी मी माझी गुंतवणूक काढून घेईल आणि रुपये २००० तोटा सहन करेल हि झाली माझी रिस्क मॅनेजमेंट. 

तर टार्गेट आणि रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला आधीच ठरवून ठेवायची आहे आणि त्यानुसार वागायचं आहे

दुसरी गोष्ट ब्रोकर निवडणे 
बाजारात सध्या ब्रोकर लोकांचा खूप सुळसुळाट झाला आहे प्रत्येक जण काही ना काही अमिश दाखवून आपल्यालाकसे वळवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो तर या सर्वात असं करायचं कि सर्व काढून सर्व माहिती मिळवायची आणि शेवटी त्या सगळ्याचे तुलना करा ज्यात ब्रोकरेज कमी असाच ब्रोकर निवडा . 

ब्रोकेरज मध्ये विविध बँक सुद्धा डिमॅट अकाउंट ची सुविधा देतात पण डिमॅट अकाउंट पेक्षा जर डिस्काऊंट ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट काढले तर कधीपण फायदेशीर ठरते. 
इंट्रा डे  कि डिलिव्हरी हे आधी ठरवा आणि त्यानुसार थोडी थोडी गुंतवणूक वाढवत जा. 

अजून बराचश्या गोष्टी आहे ज्यांची गरज शेअर मार्केट ची सुरवात करताना पडते त्या साठी मी खाली एक पुस्तकाची लिंक देत आहे  हे पुस्तक एक -बुक आहे जे आपल्या मोबाइलला मध्ये PDF  स्वरूपात येईल आणि आपल्याला कुठेही आणि कधी पण ते हाताळता येईल. 
याची किंमत फक्त ११० रुपये आहे. खालील  ठिकाणी त्याची लिंक दिली आहे आपणास गरज वाटल्यास किंवा शेअर मार्केट विषयी माहिती वाढवायची असलेया हे पुस्तक  विकत घेऊ शकता. हे पुस्तक आपल्याला थोड्या वेळात आपल्या इमेल वर येईल शिवाय त्याठिकाणी तुम्हाला  पुस्तक घेतल्याची पावती पण मिळेल.या ठिकाणी २ लिंक दिल्या आहेत दोन्ही लिंक एकाच पुस्तकाच्या आहे तुम्ही सोयीनुसार कुठलीही लिंक वापरू शकता.या लिंक सोडून दुसर्या सर्व BROWSER वर चालतात.




डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html 


शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त110रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे.

https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

 https://www.instamojo.com/uway123/1384b2fee986f178801a73db8816e177/

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...