Saturday 28 April 2018

IPO काय असतात. IPO share mhanje kay

IPO याचा फुल फोर्म initial public offer  असा होतो
चला फुलफोर्म  तर समजला पण याचा नेमका अर्थ काय ??
कस कळणार ?

यासाठी मी खाली उदाहरहण देत आहे
समजा एखादी  कंपनीची उभारणी करायची आहे आणि त्यासाठी लागणार आहे एक लाख रुपये (फक्त उदाहरण साठी हा आकडा घेत आहे ) आणि कंपनी मालकाकडे आहे फक्त पन्नास हजार..

अशा वेळेस उर्वरित पन्नास हजार कुठून आणायचे ????? तर त्यासाठी ती कंपनी IPO काढते म्हणजेच तिचे शेअर प्रथम बाजारात दाखल होणार आहे याची घोषणा करते आणि त्यासाठी काही किंमत ठेवते.

आता त्या शेअर साठी  काही लोक बोली लावतात किंवा ते शेअर आम्हाला खरेदी करायचे म्हणून कंपनीकडे मागणी करतात.

यात काय होत ??? कंपनी ते शेअर जो मागनारा आहे  किंवा ज्यांनी बोली लावली आहे अशा लोकांना ते विकत देते आणि त्यातून उर्वरीत भांडवल उभारते.अशा प्रकारे त्या कंपनीचे शेअर प्रथम बाजारात येतात.


अधिक माहिती साठी आपले नाव आणि गाव या  आपला मोबाईल नंबर 9607448980 whatsapp करा

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन नुकसानं हाऊ शकते, आपण त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या  चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या चॅनेल ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही जबाबदारी घेत नाही.

Thursday 26 April 2018

DEMAT ACCOUNT

DEMAT ACCOUNT
आता हे सर्व शिकायचं,अनुभव घ्यायचा ,नफा मिळवायचा  तर तुम्हाला स्व:तच DEMAT ACCOUNT लागेल.सर्व प्रथम DEMAT ACCOUNT म्हणजे काय हे आपण समजवून घेऊ. हे अस अकाऊंट असत ज्यात तुम्ही तुमचे शेअर ठेवतात आणि शेअर ची खरेदी विक्री करतात. जस बँकेत तुमचा सेविंग अकाऊंट आणि करंट अकाऊंट असत तसाच DEMAT ACCOUNT आणि TRADING ACCOUNT असत.
DEMAT ACCOUNT = म्हणजे  सेविंग अकाऊंट सारखं असत ज्यात तुम्ही तुमचे शेअर साठवून ठेवतात आणि योग्य परतावा मिळताच शेअर विकून टाकतात.
TRADING ACCOUNT=हे करंट अकाऊंट सारखं असत ज्यात तुम्ही रोजच्या रोज शेअर खरेदी व विक्री करतात आणि त्यातून नफा काढतात पण साठवून ठेवत नाही.काही कंपन्या वरील दोन्ही अकाऊंट एकत्रच देतात.
तर असे हे अकाऊंट उघडण्यासाठी तुम्ही काही निवडक दस्तावेज आपल्या ब्रोकर द्यावे लागतात.आजकाल ONLINE  पद्धतीने आणि आधार  कार्ड च्या माध्यमातून  DEMAT ACCOUNT उघडणे अगदी सोप्पे झाले आहे.
DEMAT ACCOUNT तुमच्या बँकेच्या अकाऊंट सोबत लिंक असते ज्यामुळे तुम्हाला सेविंग/ करंट अकाऊंट मधील पैसे DEMAT ACCOUNT मध्ये टाकू शकता तसेच शेअर मध्ये झालेला फायदा तुम्ही सेविंग/ करंट अकाऊंट मध्ये फिरवू शकतात.

Wednesday 25 April 2018

डिमॅट खाते म्हणजे काय ? demat account mhnaje kay ,shear market marathi

डिमॅट खाते किंवा डिमटेरियलाइज्ड खाते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर आणि सिक्युरिटीज खरेदी विक्री आणि साठवून ठेवण्याची  सुविधा पुरवते. ऑनलाइन ट्रेडिंग दरम्यान, समभाग डिमॅट खात्यात खरेदी केले जातात आणि साठवून  ठेवले जातात , अशा प्रकारे वापरकर्त्यांसाठी  व्यापार करणे  सुलभ होते .
डिमॅट खाते म्हणजे शेअर्स, सरकारी सिक्युरिटीज, एक्स्चेंज ट्रेडेड फंड, बॉण्ड्स आणि म्युच्युअल फंडाचे एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक.
तीही सुरक्षित आणि आपल्या स्व:तच्या  हातात.
डिमॅट खाते उघडण्यास काही निवडक दस्तावेज जस कि आधार कार्ड  बँकेचे कागदपत्रे वैगेरे लागतात शिवाय हे अकाउंट उघडण्यास काही वार्षिक फीस असते ती द्यावी लागते.

Tuesday 24 April 2018

शेअर मार्केट मध्ये फसवणूक होते का ? share bajarat fasavnuk hote ka


नाही फसवणुकीची संधी येथे कुठेच 
नाही.

सर्व व्यवहार तुमच्या स्वतःच्या हातात 
असतात आणि पै पै चा हिशोब तुम्हाला 
नियमित पणे दिला जातो.


रोज सायंकाळी जर तुम्ही खरेदी विक्री 
केली असेल तर तुम्हाला संदेश तुमच्या 
मोबाईल वर येतो.

फसवणुकीला टाळण्यासाठी SEBI हि 
संस्था काटेकोर नियम लावत असते.

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...