Tuesday, 4 September 2018

शेअर ब्रोकरेज आणि ब्रोकर ,broker ani brokerage

नमस्कार मित्रानो 
तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार 
आजचा हा लेख मी बनवत आहे ब्रोकरेज म्हणजेच शेअर खरेदी आणि विक्री साठी लीगणारी फीस 
आणि हि किती असू शकते याबद्दल. 

आपण सगळे या शेअर मार्केट साठी कदाचित नवीन असाल आणि त्यामुळेच आपल्याला यात खूप अडचणी येत असेल म्हणूनच माझ्झ्या वाचकांच्या अग्रहवास्तव मी हा लेख लिहीत आहे. 
मी खाली एक उदाहरण देत आहे ज्यात आपण शेअर खरेदी विक्रीची जी फीस भरतो ती कोणाकडे आणि कशी भरतो आणि ब्रोकर कोण आहे हे समजावून सांगितले आहे. 

एका शेतकऱ्याला ह्या वर्षी  १०० पोते गहू झाला आता तो गहू जर त्याला विरून पैसे कमवायचा आहे तर त्याच्या समोर २ पर्याय आहे 

पहिला पर्याय म्हणजे तो डायरेक्ट दुकान मांडणार आणि ज्यात गहू विक्री करणार,ह्या गोष्टीत त्याला खूप मोठे मजूर दुकान ,वजन काटा ,आणि इतर गोष्टी लागणार शिवाय त्याला स्वतःच त्या ठिकाणी थांबून सर्व व्यवहार बघावा लागणार बरोबर ना. 


आणि दुसरा पर्याय कि तो आडत  किंवा मोंढा किंवा धान्य बाजारात जाणार त्या ठिकाणी तो आपला संपूर्ण गहू एका व्यापाऱ्याला विकणार  आता व्यापाऱ्याकडे दुकान थाटण्यासाठी लागणारे सर्व सामान आणि मजूर आधिपासुनच  असेल आणि तो एक एक पोटे गिर्याईकाला त्याच्या मागणी नुसार काही पॆसे वाढवून विकणार 

अगदी तसेच शेअर ब्रोकर चे आहे 
या उदाहरणातील शेतकरी म्हणजे शेअर बाजारातील विविध कंपन्या आहे   त्यांनी ब्रोकर ला परवानगी दिली आहे कि आमचा गहू तू विकला पाहिजे (ब्रोकर म्हणजे असा माणूस किंवा कंपनी जी शेअर बाजारातील विविध शेअर आपल्याला विकत देते किंवा घेते म्हणजेच शेअर चा व्यापारी )
आणि यात शेअर विकत घेणारे  म्हणजे आपण /गिराईक  आहे . 

आपण जेंव्हा काही शेअर विकत घेतो तेंव्हा ते शेअर चे विनिमय होण्यासाठी जी फीस द्यावी लागते त्यालाच ब्रोकरेज म्हणतात. 

ब्रोकरेज सोडून शेअर खरेदी विक्री वर आणखी फीस लागते ती फीस खालील प्रमाणे असते. मी झेरोधा  ब्रोकर ची फीस काय असू शकते हे खालील चित्रात  सांगितलेले आहे 

यात त्यांचे ब्रोकेरज चार्जेस हे ०.०१% एवढे दिले आहे म्हणजेच तुम्हाला रुपये १०० च्या देवाण घेवाणीसाठी १ पैसे एवढाच ब्रोकरेज लागेल. म्हणजे १००० रुपयाला फक्त आणि फक्त १० पॆसे 
आणि १० हजार रुपयाला ब्रकेरेज लागेल १ रुपया 
आणि १ लाख रुपयाला ब्रोकरेज लागेल फक्त १० रुपये 



ब्रोकेरेंज  हा तुमच्या खरेदी आणि विक्री ची किंमत मिळवून त्यावर लावला जातो 
म्हणजेच शेअर खरेदी केले १० हजार रुपयाचे आणि विकले १० हजार रुपयालाच तर मग तुम्हाला २० हजारावर ब्रोकरेज आणि बाकीचे चार्जेस लागतील . 

मी अपेक्षा करतो कि वरील माहिती तुम्हाला समजली असेलच पण जर शेअर मार्केट विषयी आणखी काही जाणूनच  घ्यायचं आहे तर खालील लिंक वर एक ईबुक  दिलेले आहे ज्यात सॉफ्टवेअर मध्ये शेअर कसे बघायचे शेअर कुठले घ्यायचे ,मार्केट मध्ये तोटा झालं तर काय करयचा आणि जे नवीन आहे ज्यांना काहीच माहिती नाही अशा लोकांनी तर पुस्तक घेतलेच पाहिजे










डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा.

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html 

No comments:

Unlock Your Financial Potential with SEBI Investor Certification Examination Study Material

 Navigating the complexities of financial markets can be daunting, but the SEBI Investor Certification Examination offers a gateway to maste...