Friday 11 January 2019

E M I - किती असावा ???--कर्ज किती घ्यावे ??

*E M I - किती असावा ???*
नमस्कार ,

             आज अतिशय महत्वाच्या अशा मुद्यावर आपण माहिती घेणार आहोत, तो म्हणजे EMI किती असावा? खरेतर EMI किती  असावा याचा काही नियम नाही. तुम्ही कितीपण  EMI घेऊ शकता परंतू, खरच आपण त्याला काही  तरीमापदंड लावायलाच पाहिजे,  नाहीतर पगार कमीआणि EMI जास्त होतो. EMI ची एकदा  सवय लागली की मग आपण त्या  ट्रॅप मध्ये अडकत  जातो आणि बाहेर पड़ने खुप अवघड होऊन जाते,

 मी मागच्याच महिन्यात अनुभवलेला एक EMI चा ट्रॅप. त्या ट्रॅप मध्ये अड्कलेल्या एका फॅमिलीचा EMI किती होता ते बघू…
   मला गेल्या महिन्यात माझे एक गुंतवणूकदार  त्यांचा फ़ोन आला, त्यांच्या मित्रालाही आर्थिक नियोजन करायचे होते. मी ठरल्या  प्रमाणे त्यांच्याकडे गेलो. थोड्या गप्पा झाल्या, मी त्यांच्या  लाइफ स्टाइल , फ्लॅट,घरातील महागड़े फर्निचर आणि इतर गोष्टी बघून खूपच इम्प्रेस झालो ,खूपच सुंदर घर होते ते. मग म्हटले आता आर्थिक नियोजन करण्याच्या कामाला  सुरुवात करूया. मी त्यांची वैयक्तिक माहिती घ्यायला  सुरुवात केली जसे की वय ,जॉब कुठेकरतात ,फॅमिली मध्ये कोण कोण असतात , पॅकेज किती (पगार). इथपर्यंत काहीच प्रॉब्लम वाटला नाही पण जेव्हा मी कॅशफ्लो स्टेटमेंट तयार करण्यासाठी  खर्च अणि EMI बद्दलविचारपूस करायला सुरुवात केली तेव्हा खुप मोठा धक्काचबसला मला. तुम्ही बघा तुम्हालाही बसेल…

पगार :   पती - 60000 , पत्नी 40000 (दोघांचा मिळून 100000 ( काहीच वाईट नाही खुप चांगला पगार आहे)
EMI :    होम लोन - 40000 ( 45 lac चा फ्लॅट) 
कार EMI --10000 ( 10 लाखाची  ) 
पर्सनल लोन EMI -10000 ( वार्षिक फॅमिली ट्रिपसाठी पर्सनल लोन घेतले होते ) 
क्रेडिट कार्ड EMI - 4000( ट्रिप साठी खरेदी )
आठवड्याचा खर्च  - 5000 ( शनिवार/रविवार सुट्टी असते कार घेऊन कुठे तरी बाहेर)
इन्शुरन्स - 5000 दरमहा प्रीमियम (ULIP पॉलिसी 500000 लाइफ कव्हर )
मेडिक्लेम - नाही ( कंपनी ने दिलेला आहे )
आता आपण खर्चाची TOTAL करू या ,
40000+10000 +10000 +4000 +20000 (आठवड्याचा खर्च 4*5000)+5000=94000 ,( या  मध्ये महिन्याचा किराणा +TAX +इतर खर्च पकडलेला नाही ) याला म्हणतात परफेक्ट EMI ट्रॅप, 


             मी जेव्हा विचारले की पगारामधून पैसे तर काहीच उरत नाही मग खर्च कसा चालतो त्यांचे प्रामाणिक उत्तर क्रेडिट कार्ड आहे ना. ते पुढे म्हणाले की आता या सगळ्या EMI ची भीती वाटायला लागली म्हणूनच तुम्हाला बोलावले  आहे. (या सगळ्या EMI मुळे वय 35 झाले तरी अजुन बाळासाठी प्लानिंग केले नाही कारण  एकाला जॉब सोडावा लागेल आणि एकाच्या उत्पन्नावर घर चालणार नाही)

           एकदा तुम्हाला क्रेडिट कार्ड अणि EMI ची सवय लागली की तुम्ही स्वतासाठी कधीच संपत्ती तयार करू शकत नाही कारण आपण क्रेडिट कार्ड अणि EMI साठीच काम करत राहतो. वरील फॅमिली साठी मी पुढे आर्थिक नियोजन तयार करुण दिले.
आपण या मधून काहीतरी शिकायला हवे म्हणून हा अनुभव इथे दिला आहे.


१)    कोणाचे घर खुप मोठे अणि सुंदर  आहे याचा अर्थ ती व्यक्ति खुप श्रीमंत आहे असा होत  नाही (कदाचित सगळे  EMI वर घेतले असेल व त्या  EMI च्या टेंशन मुळे रात्रीची झोप ही शांत लगत नसेल )
२)    कार किती मोठी आहे यापेक्षा तिने तुमचे किती पैसे खर्च केले हे अधिक महत्वाचे आहे.
३)    पर्सनल लोन घेऊन कधीही ट्रिप करू नका
४)    क्रेडिट कार्ड म्हणजे उद्या येणारा पैसा आजच खर्च करणे  ( क्रेडिट कार्ड चे व्याज जगात सर्वात जास्त असते २५% ते ४४%)
५)    शनिवार /रविवार सुट्टी असते याचा अर्थ दरवेळी खर्च करुण बाहेरच जावे असे नाही.
६)    विमा पॉलिसी साठी आपण किती प्रीमियम भरतो यापेक्षा ती पॉलिसी आपल्याला किती विमा सरक्षण देते ते महत्वाचे,

             पगार अणि खर्च यांचा टाळेबंद जर योग्य पद्धतीने मांडता नाही आला तर कर्ज बाज़ारी होण्याची वेळ येते.
घाई करने - बऱ्याच वेळा घर घेण्याची ,कार घेण्याची खुप घाई केली  जाते, त्या वस्तु घेताना खुप घाई न करता आपला पगार किती , आपल्याला त्या गोष्टीची गरज किती ,या गोष्टी  आपल्याला समाधान देणाऱ्या असल्या पाहिजे, उगाचच कोणी मित्राने किवा नातेवाईक ने घेतली म्हणून मी  मोठी कार किंवा घर घेतो असे करू नये.

पुढे आपण कोणत्या गोष्टीवर किती खर्च करावा याची माहिती देत आहे,( हा काही नियम नाही परन्तु असे केल्याने आपण आयुष्यात कधीही आर्थिक संकटात सापडणार नाही.

इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??

इंट्राडे शेअर म्हणजे काय आणि ते  कशे निवडायचे आणि त्याचे काही फंडे खालील पुस्तकात दिलेले आहे हे पुस्तक ईबुक प्रकारात आहे  म्हणेज तुम्ही ते कुठेही आणि कधीही  मोबाइल व कॉम्पुटर वर वाचू शकतात व ते तुम्ही पैसे दिल्यानंतर तुमच्या ई-मेल वर येते किंवा तिथेच डाउनलोड  बटनावर क्लीक करून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकतात  यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लीक करा 


आता Demat Account उघडण्यासाठी ब्रोकर कडे जाण्याची गरज नाही. आपले Account आपणच उघडा  खालील लिंक वापरून OPEN DEMAT ACCOUNT

ON TWITTER https://twitter.com/MarathiShare/status/1052073404155789313

शेअर मार्केट ची बेसिक माहिती पाहिजे असेल आणि गुंतवणुकीला सुरवात करताना काय काय करायला पाहिजे याचा जर अभ्यास करायचं असेल तर पुढील पुस्तक खर्डे करा ज्यातून खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल  https://bit.ly/2UNPQnN

तुम्हाला जर आणखी काही माहीती  हवी असेल तर तुमचे नाव ,ई-मेल ,गाव आणि अनुभव 9607-448980 या क्रमांकावर पाठवा. 
इंस्टाग्राम वर सर्च करा https://www.instagram.com/share_market7/
फेसबुक वर आम्ही या पेज वर आहोत https://www.facebook.com/sharermarketmarathi


DISCLAIMER:
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. गुंतवणूक आणि शेअर ट्रेडिंग ह्या मुळे तुमच्या भांडवलाची अंशतः किंवा संपूर्ण हानी होऊन नुकसानं होऊ शकते, आपण त्यास सर्वस्वी जबाबदार असाल. आम्ही आपले गुंतवणूक सल्लागार नाही. ह्या  चॅनेल मध्ये दिलेली माहिती कोणतेही परताव्याची हमी देत नाही. आपली गुंतवणूक आणि भांडवल ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ह्या चॅनेल ची निर्मिती निव्वळ माहिती आणि शैक्षणिक कामासाठी केली आहे.आम्ही आपली कुठलीही जबाबदारी घेत नाही

No comments:

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...