Wednesday 10 October 2018

शेअरबाजार आणि पूर्वदुषितग्रह

माझ्या एका क्लायंट ने हा लेख पाठवला आहे 
अतिशय उत्तम पद्धतीने यात सांगण्यात आले आहे कि
share  मार्केट मधेच गुंतवणूक का करायची आणि कशी याप्रकारे करायची.  कृपया हा लेख   पूर्ण  वाचा आणि आमचा ब्लॉग ला FOLLOW  करा. 


शेअरबाजार आणि पूर्वदुषितग्रह
*फक्त ३% भारतीय हे शेअरबाजारात सरळ किंवा म्युचल फंङच्या माध्यमातुन गुंतवणुक करतात*. याचा अर्थ ९७ % भारतीय म्हणजे तब्बल १२१ कोटी जनता अजुनही शेअरबाजारापासुन कोसो दुर आहे.
काही जण त्याला सट्टा म्हणतात, तर काही जण त्याला जूगार म्हणुन हिणवतात. काही जणाकङे तर नाकारण्यासाठी *_विशेष अस कारण_* पण नसत.
आता हेच बघा ना,
अामच्या एका ओळखीच्या गृहस्थाने स्वत:चा साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाला *इन्फोसिंस* कंपनीत चांगल्या पगारावर नौकरी लागल्यावर गावभर पेढे वाटले. कारण तो लहान असल्यापासुन त्याला तिथ नौकरी लागावी अस स्वप्न म्हणे त्यांनी बघितल होत ..
तुमच्याकङे *इन्फोसिंस* कंपनीचे काही शेअर्स आहेत का अस विचारल्यावर,
" *मी असा सट्टा लावत नाही*"
अस त्यांच उत्तर होत याला काय
म्हणाव...??
.
म्हणजे कंपनी चांगली आहे म्हणुन त्यांना त्यांचा मुलगा तिथे नौकरीला लागायला हवा होता पण त्याच *कंपनीच्या कामगिरीचा आरसा असलेल्या कंपनीचे शेअर्स घेण म्हणजे जुगार लावण अस त्यांना वाटत होत.. एवढा हा विरोधाभास होता.*
तीच गोष्ट एक बॅंकर असलेल्या व्यक्तीची..
*SBI बॅकेत* गेल्या २० वर्षापासून नौकरी करत असलेल्या व आमच्या शेजारी रहात असलेल्या या गृहस्थाचा किस्सा तर खुपच मजेशीर आहे.

त्यांनी १ जूलै २००० साली त्यांच्याच *SBI बॅकेत ५ लाख रु. *FD* *केली होती.* त्यावेळी २ वर्षाच्या असलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी ही FD केली होती. *आज तिचे मुल्य २६ लाख रु.* झाल्याच ते मला अभिमानाने सांगत होते पण माझ्या चेहर्‍यावर आनंदाची छटा न दिसल्यावर त्यांनी काय झाल अस विचारल..
मी म्हणालो, *"साहेब.. तुम्हाला "दिर्घ कालावधी साठी गुंतवणुक करायची होती" तर, तुम्ही FD न करता त्यावेळी "चांगल्या कंपनी च्या शेअर्स किंवा इक्विटी फंङात" गुंतवणुक का नाही केली??"*

ते म्हणाले, *"अहो , त्या शेअरबाजाराच काय खरय..? उद्या कंपनी बुङाली तर मुलाच शिक्षण कस करणार?"*
मी म्हणालो, "मग तुमच्याच बॅकेचे शेअर्स का नाही घेतले. ती तर सरकारीच आहे ना मग बुङायची तर भीतीच नव्हती."
म्हणाले, *" अहो त्यातला परतावा खाञीचा नसतो ना ..!!"*

आता माञ मला रहावेना , आता मी त्यांना जे काही दाखवणार होतो त्यामुळे ते नक्कीच पश्चाताप करणार होते. पण निदान हा वारसा पुढे जावु नये व त्यांच्या पुढील पिढीने तरी तीच चुक परत करु नये यासाठी मला हे पाऊल ऊचलण भागच होत.
मी त्यांना एक वही व पेन घेवुन माझ्या आॅफीसमध्ये बसवले.

त्यांनी ज्या दिवशी *बॅंकेत FD केली त्या १ जुलै २००० रोजीचा SBI च्या एका शेअरचा भाव होता २२ रु.* म्हणजे *५ लाख रु मध्ये तब्बल २२७२७ शेअर्स आले असते* हे मी त्यांना इंटरनेटवर दाखवल.
मधल्या काळात *१ शेअरचे १० शेअर्समध्ये विघटन झाल* म्हणजे आज त्या *२२,७२७ शेअर्सची एकुण संख्या २,२७,२७०* आणि *आता *एक शेअरचा भाव आहे २२० रु.*

आता त्यांना म्हटलं हिशोब करा कि, या सर्व शेअर्सच आताच एकुण मुल्य किती असेल..?
*२,२७,२७०x२२०=४,९९,९९,४०० रु.*
म्हणजे तब्बल *५ करोङ रु.* शिवाय शेअर्समधून दरवर्षी मिळालेल्या *करमुक्त ङिविङंङची एकूण रक्कम होती *७९ लाख रु.*
*नफा + ङिवीङंङ अशा एकुण *५.८०* *करोङ रु* एवढ्या रकमेवर फक्त एका शुल्लक व पुर्वग्रहदुषित असलेल्या गृहीतकापायी त्यांनी अक्षरश: पाणी सोङल होत.
.
अगदी अॅसेट अलोकेशन करत अर्धी रक्कम जरी त्यांनी शेअर्स किंवा इक्विटी फंङात गुंतवली असती तरी परतावा या २६ लाखापेक्षा निश्चीतच कितीतरी जास्त आला असता.

आता माञ ते पस्तावल्यासारखे दिसत होेते कारण संपुर्ण २० वर्षाच्या नौकरीत पण त्यांनी एवढे पैसे मिळवले नव्हते.

अर्थात त्यांच्या भावना दुखाव्यात असा माझा मुळीच हेतु नव्हता. तर *दिर्घकालीन गुंतवणुक* ही केवळ *चांगल्या इक्विटी फंङ* किंवा *चांगल्या शेअर्स* आणि *रियल इस्टेट इ.* मध्ये *विभागुन करावी* एवढच मला त्यांना सांगायच होत.

*_" शहाणा माणूस हा नेहमी दुसर्‍याच्या अनूभवातुन शिकत असतो अस म्हणतात. जुन्या व बुरसटलेल्या विचारसरणीवर विसबुंन न राहता आपल्या गूंतवणुकीची नव्याने मांङणी करने हा एक संदेशच या उदाहरणातून तुन आपल्याला मिळतो.....!!"_



इंट्रा डे शेअर म्हणजे काय ??
ते कुठले असतात ?? इंट्रा डे शेअर डिलिव्हरी या प्रकारात घेता येऊ शकता का असे असंख प्रश्न आपल्याला पडत असतात बरोबर ना ??? त्यासाठी आज या पुस्तकात मी इंट्रा डे साठी शेअर निवडताना काय करायला पहिजे, ते कसे निवडायचे , शेअर मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर किंवा शेअर मार्केट बंद झाल्यावर मला इंट्रा डे शेअर निवडता येईल का ? त्यासाठी काय करावं लागत ? हे मी आज सांगणार आहे .हे पुस्तक बोलीभाषेत लिहले आहे जेणेकरून समजायला थोडासा सोप्पं जावं. शेअर मार्केट सारखा टेकनिकल विषय म्हंटल्यावर डोक्याचं खोबर होत तर ते न करता रंजक पद्धतीने जशा आपण गोष्टीच्या माध्यमातून संदेश देतो त्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे.त्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.instamojo.com/uway123/e02da340c3aa25cf6249fe35fd5befd7/



शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , पेपर ट्रेडिंग , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,झटपट पैसे कसा कमवायचा ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त 110 रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे. https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/



डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html

7 comments:

Unknown said...

खुप छान माहिती आहे

Unknown said...

Sir Very good information. Thaks a lot.

Santosh behere said...

Fantastic

Unknown said...

Sir thanks a lots

Unknown said...

nice......

Unknown said...

नमस्कार सर मी तुम्हाला जी फुल नाही पन फुलांची पाकळी जी तुमच्या कर्तुत्वाला करयॅला जी मदत केली आहे आसीच मा

Unknown said...

सर मराठी माणूस म्हणून मराठी मानसाना असीच माहीती आपन आपल्या माध्यमातून देत राहो हीच आपनास विनंती आपले सहकार्य आसेच सगळ्यांना मिळत रोहो हीच माफक अपेक्षा

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...