Saturday 25 August 2018

काय तुम्ही शेअर बाजारात नवीन आहात??

काय तुम्ही शेअर बाजारात नवीन आहात

नमस्कार सर ,
माझ नाव किरण ,मी शेअर बाजारात नवीन आहे मला यातील काहीच माहिती नाही आणि मला हे सर्व शिकायचं  आहे त्यासाठी काय कराव लागेल
अशा आशयाचे अनेक प्रश्न मला माझे CLIENT मला विचारात असतात
मी दिलेल्या उत्तराने काही लोकांचे समाधान  होते तर काही जन आणखी द्विधा मनस्थितीत पडतात त्यामुळे आज हा लेख मी आपल्या पर्यंत पोहचवत आहे.शेअर मार्केट मध्ये उतरायचं तर काय काय तयारी केली पाहिजे  तर सर्वात पहिले  आपल्याकडे काही महत्वाच्या गोष्टी पाहिजे, ह्या महत्वाच्या आपल्या दैनदिन जीवनातल्या आहे  आपल्याला मी विनंती करतो किं त्या गोष्टी जर नसेल तर सर्व प्रथम त्या उपलब्ध ठेवा.

डिमॅट अकाउंट साठी लागेल
पॅन कार्ड
आधार कार्ड
ज्या बँकेचे खाते आहे त्याच बँकेचा चेक
किंवा सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट.
 कॉम्पुटर / मोबाईल / लॅपटॉप
किंवा टॅबलेट ज्याला इन्टरनेट काँनेक्टिविटी आहे.

शेअर बाजारात तुम्ही उतरताय  म्हणजे तुम्हाला लाखो रुपये कमवण्याची इच्छा असेल पण हे कमवायचे कसेयाची माहिती घेता जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये उतरले तर समजून घ्या तुमच्या गोड स्वप्नावर पाणी फिरले आहे. शेअर बाजारात उतरताना खालील माहिती घेणे खूप गरजेचे आहे

सर्व प्रथम  जर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज आहे किंवा तुम्ही हा विचार करताय कि मी कुणाकडून तरी उधार घेऊन शेअर बाजारात गुंतवले  आणि अल्प कालावधीत त्याची रक्कम दुप्पट करेल तर हे भरदिवसा पाहिलेले स्वपच आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा  पहिला  नियम कुणाचाही पॆसा उधार घेऊन गुंतवणूक करू नका आणि तुच्यावर जर कुणाचा पॆसा उधार असेल तर तो लवकरच परतफेड करा आणि मगच शेअर बाजारात  उतरा. 

शेअर बाजारात जो पैसा तुम्ही अडकवणार आहे तो तुमच्या गरजेच्या गोष्टीतील नकोच. 
जर पुढच्या - महिन्यात तुच्या घरात एखादे मंगल कार्य आहे ,नवीन वस्तू घयायची आहे ,लग्नासाठी किंवा बर्थडे साठी पैसे जमवले  आहे  तर असा पैसे शेअर मध्ये नका लावू  कदाचित तुम्ही पॆसे गुंतवले आणि मार्केट कोसळलं तर लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागणार नाही अशा वेळ तुम्ही शेअर मार्केट ला शिव्यांची लाखोली वहाल आणि लोंकाना सांगाल कि शेअर बाजारात पॆसे फक्त बुडतातच. 

हातात शिल्लक असणारा किंवा तुमची अशी सेविंग ज्याची पुढची वर्ष तरी गरज पडणार नाही अशा रक्कम तुम्ही शेअर बाजारात गुंतवू शकतात. 
हा पॆसा गुंतवत अस्ताणेच तो कुठल्या कारणास्तव गुंतवला आहे आणि त्याची किती वाढ झाल्यावर तो शेअर मार्केट मधून काढायचा हे आधीच ठरवले गेले पाहिजे सोबतच यात रिस्क मॅनेजमेंट पण केली पाहिजे. 

जसे कीं तुम्ही १०००० रुपये गुंतवत आहेत तर १०००० जेंव्हा १२०००  होतील तेंव्हा मी ते बाजारातून काढून घेईल तर रुपये १२००० झाली तुमची टार्गेट रक्कम आणि जर गुंतवलेले पैसे  ८००० झाले तरी मी माझी गुंतवणूक काढून घेईल आणि रुपये २००० तोटा सहन करेल हि झाली माझी रिस्क मॅनेजमेंट. 

तर टार्गेट आणि रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला आधीच ठरवून ठेवायची आहे आणि त्यानुसार वागायचं आहे

दुसरी गोष्ट ब्रोकर निवडणे 
बाजारात सध्या ब्रोकर लोकांचा खूप सुळसुळाट झाला आहे प्रत्येक जण काही ना काही अमिश दाखवून आपल्यालाकसे वळवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो तर या सर्वात असं करायचं कि सर्व काढून सर्व माहिती मिळवायची आणि शेवटी त्या सगळ्याचे तुलना करा ज्यात ब्रोकरेज कमी असाच ब्रोकर निवडा . 

ब्रोकेरज मध्ये विविध बँक सुद्धा डिमॅट अकाउंट ची सुविधा देतात पण डिमॅट अकाउंट पेक्षा जर डिस्काऊंट ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट काढले तर कधीपण फायदेशीर ठरते. 
इंट्रा डे  कि डिलिव्हरी हे आधी ठरवा आणि त्यानुसार थोडी थोडी गुंतवणूक वाढवत जा. 

अजून बराचश्या गोष्टी आहे ज्यांची गरज शेअर मार्केट ची सुरवात करताना पडते त्या साठी मी खाली एक पुस्तकाची लिंक देत आहे  हे पुस्तक एक -बुक आहे जे आपल्या मोबाइलला मध्ये PDF  स्वरूपात येईल आणि आपल्याला कुठेही आणि कधी पण ते हाताळता येईल. 
याची किंमत फक्त ११० रुपये आहे. खालील  ठिकाणी त्याची लिंक दिली आहे आपणास गरज वाटल्यास किंवा शेअर मार्केट विषयी माहिती वाढवायची असलेया हे पुस्तक  विकत घेऊ शकता. हे पुस्तक आपल्याला थोड्या वेळात आपल्या इमेल वर येईल शिवाय त्याठिकाणी तुम्हाला  पुस्तक घेतल्याची पावती पण मिळेल.या ठिकाणी २ लिंक दिल्या आहेत दोन्ही लिंक एकाच पुस्तकाच्या आहे तुम्ही सोयीनुसार कुठलीही लिंक वापरू शकता.या लिंक सोडून दुसर्या सर्व BROWSER वर चालतात.




डिमॅट अकाउंट उडण्यासाठी 9607-448980 या नंबर वर आपले नाव व ई-मेल पाठवा. डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी मदत / मार्गदर्शन केल्या जाईल. डिमॅट अकाउंट १० मिनटात उघडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://sharermarketmarathi.blogspot.com/2018/07/demat-account-in-10-minutes.html 


शेअर मार्केट ची बेसिक माहिती व ट्रेंड , शेअर ची माहिती कुठून मिळवावी, गुंतवणुकीचे मार्ग ,शेअर बाजारचे फायदे तोटे या सर्व गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी फक्त110रुपयात खालील लिंक वर पुस्तक(इ -बुक )उपलब्द आहे.

https://www.instamojo.com/uway123/d888bbde4c6ae459d588dbf445865e50/

 https://www.instamojo.com/uway123/1384b2fee986f178801a73db8816e177/

17 comments:

Varad said...

सर चांगली माहिती दिलात

Unknown said...

खुप छान माहिती

Unknown said...

Nice very good

Unknown said...

Nice very good

Unknown said...

Very good

Unknown said...

अतिशय उत्तम माहिती दिली आहे..

Unknown said...

Thank u

Unknown said...

Sir dekar account kase open karave

Unknown said...

Sir deamt account kase open karave

Unknown said...

छान

Sanjay chirkutrao Dhole said...

Sir Aapan far chhan mahiti deta Thank you

Unknown said...

Konte demate account best ahe

Unknown said...

Je e pustak aahe tyat kontya topics var mahiti aahe sir

Unknown said...

Good knowledge for new biginer

जनार्दन पाटील भुते उमरजकर यांच्या आठवणी said...

छान माहिती

Unknown said...

खूप छान माहिती आहे

Unknown said...

खूप छान माहिती आहे

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...