Wednesday 25 July 2018

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे.....

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे.....
******************************
१. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखील आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.

२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.

३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.

४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.
५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.

६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व
CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत.

पहिला नियम, कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.

७.घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

८. बिल गेट्स या जगातील दुसर्या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफें बरोबर बोलण्यासारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींगसाठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेट्स हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.

९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला
-- "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."
-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅन्ड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.

* अपार कष्ट करा : मेहनत कधीच वाया जात नाही, पण काम न करता केलेली वायफळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही.

* आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.

* ऊत्पन्न(मिळकत) : कधीही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणार्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

* खर्च - आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकण्याची वेळ येईल.

* बचत - खर्च करुन उरलेल्या उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.

* हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा छिद्रामुळे पुर्ण जहाज बुडू शकते.

One of the best messages I've ever read..

FD ( फिक्स्ड डिपॉजिट) कराताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

फिक्स्ड डिपॉजिट  (FD) हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जे तुम्हाला नियमितपणे व्याज मिळवून देतो. गेल्या काही दिवसांत, अनेक बँकांनी FD वरी...